मुंबई – 90 च्या दशकात अनेक बॉलिवूड जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अशीच एक जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडनची. अक्षय कुमार आणि रवीना टंडन 90 च्या दशकात अफेअरमुळे चांगलेच चर्चेत होते. रवीना टंडनने अनेक मुलाखतींमध्ये अक्षयबद्दल बोलले आहे. यासोबतच तिने अक्षयच्या बेवफाईची गोष्टही अनेकदा सांगितली आहे. मात्र तब्बल 20 वर्षानंतर दोघेही नुकतेच एकत्र दिसले. दोघांचा एकमेकांशी बोलतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षय आणि रवीना एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. रवीना आणि अक्षयला इतक्या दिवसांनी एकत्र बघून चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
VIDEO : The blockbuster duo of @akshaykumar and @TandonRaveena are indeed FOREVER TRUE BLUE ROCKSTARS 🙂#AkshayKumar𓃵 #AkshayKumar pic.twitter.com/YG6D1InsMV
— Akshay Kumar FG (@AKFansGroup) May 7, 2023
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवीना आणि अक्षय एकाच स्टेजवर आहेत. यावेळी रवीना अक्षयच कौतुक करताना दिसत आहे. रवीना म्हणते, “90 च्या दशकातील एक रॉकस्टार, जो आजही रॉकस्टार आहे आणि जो नेहमीच रॉकस्टार राहील”. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोघेही सोबत बसून गप्पा मारताना दिसत आहेत.