नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या राहत्या घराच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी नव्हे तर 171 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे.
माकन म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या निवासी संकुलाचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या सरकारला ज्या अधिकाऱ्यांची घरे पाडण्यात आली किंवा रिकामी करण्यात आली त्यांच्यासाठी अतिरिक्त सदनिका खरेदी कराव्या लागल्या.
अजय माकन यांनी आरोप केला की कोविडच्या काळात दिल्लीतील जनतेचे 171 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेव्हा दिल्लीतील लोक ऑक्सिजनसाठी तळमळत होते, हॉस्पिटल आणि बेडसाठी तळमळत होते.
जेव्हा गरीब माणूस अन्नासाठी तडफडत होता. या बांधकामाधीन संकुलात 22 अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत, जे पाडून ते रिकामे करण्यात आले आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी सरकारने राष्ट्रकुल क्रीडा गावात 126 कोटी रुपयांचे 21 टाइप-5 फ्लॅट्स खरेदी केले आहेत.