मुंबई – अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रविना टंडनने खिलाडी, बारूद, किमत, दावा यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र गेल्या 19 वर्षात या जोडीने एकत्र चित्रपटात काम केलेले नाही. मात्र आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास सज्ज होणार आहे. ‘वेलकम 3’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे.
‘वेलकम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर आणि अनिल कपूर आणि परेश रावेल यांच्या दमदार अभिनयाने सिनेमाला चारचाँद लावले. वेलकम चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर या चित्रपटाचा ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून वेलकम 3 चित्रपटाची चर्चा रंगली आहे. यातच आता या चित्रपटात रवीना आणि अक्षयची जोडी पाहायला मिळणार असल्याने चाहतेही आनंदी आहेत.
या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी आणि अर्शद वारसी दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या चित्रपटात रवीनाचीही एंट्री होणार आहे. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी 2004 मध्ये रविना आणि अक्षय कुमार ऑन-मॅन अॅट वर्कमध्ये एकत्र दिसले होते.