अकोला :- मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच अकोला कमी तापत असल्याचे जाणवत असून, दीड महिन्यानंतर प्रथम सोमवारी 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
यापूर्वी 6 मे रोजी 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. लांबलेला मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असला तरी अकोल्यात मात्र तापमान रविवारपर्यंत 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्तच होते.
विदर्भात मान्सूनचे आगमन साधारणपणे 15 जूनच्या आसपास होते, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मात्र यंदा स्थिती वेगळी निर्माण झाली असून, मान्सून पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
तापमानातील चढ-उतार पुढीलप्रमाणे –
15 जून : 41.3
16 जून : 41.3
17 जून : 42.00
18 जून : 40.1
19 जून : 39.8