बडोदा – कायदा सर्वांना समान असल्याचे वक्तव्य भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत. असे असेल तर मग त्यांनी आधी स्वपक्षीयांच्या नेत्यांच्या बेकायदा इमारतींवर बुलडोझर चालवून दाखवावेत, असे खुले आव्हान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारला दिले आहे.
अवैध निर्माण व कॉलोनियों पर बुलडोज़र चलाने से पहले भाजपा सरकार अपने सभी कार्यालयों, मंत्री, नेताओं व कार्यकर्ताओं के घरों, दुकानों व प्रतिष्ठानों के वैध नक्शे व अनुमति की जाँच कर उन पर बुलडोज़र चलाए।
दूसरों का घर-दुकान गिरानेवाले भाजपाई पहले ख़ुद पर इसे लागू करके दिखाएं।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 12, 2023
यादव म्हणाले, बेकायदा बांधकामे आणि वसाहतींवर बुलडोझर चालवण्यापूर्वी भाजप सरकारने आपली सर्व कार्यालये, मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांची घरे, दुकाने आणि आस्थापनांचे वैध नकाशे आणि परवानगी तपासून बुलडोझर चालवावा, असे ट्विट त्यांनी केले आहे. जे भाजपवाले दुसऱ्याची घरे, दुकाने पाडतात त्यांनी आधी स्वतःला बुलडोझर धोरण लागू करावे.
Uttar Pradesh : बलिया जिल्ह्यातील गोशाळेत गेल्या 15 दिवसांत 8 गायी दगावल्या
अखिलेश यादव शनिवारी गुजरातमध्ये होते, तिथे त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आणि म्हणाले की, गांधीजींच्या अहिंसा आणि सौहार्दाच्या तत्त्वांऐवजी आज भाजप सरकारांनी एन्काउंटर आणि बुलडोझर, हिंसाचाराचे प्रतीक अशी मानसिकता स्वीकारली हे दुर्दैव आहे.