बीजिंग – अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या चीनच्या लष्करी जनरलला चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेरिकेच्या संकेतांना सरळ सरळ धुडकावून लावण्याचे चीनचे धोरणच यातून दिसून येते आहे.
जनरल ली शेंगफू हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीतील जनरल आणि एरोस्पेस इंजिनिअर आहेत. रशियाची सुखोई एसयू-35 लढाऊ विमाने आणि एस-400 ही हवाई संरक्षण यंत्रणा चीनच्या “इक्विपमेंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट’कडून खरेदी केल्याने अमेरिकेने रशियावर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपाखाली अमेरिकेने “इडीडी’ आणि या संस्थेचे तत्कालिन संचालक जनरल ली शेंगफू यांच्यावर 2018 मध्ये निर्बंध घातले आहेत.
आज जनरल ली शेंगफू यांना चीनच्या “नॅशनल पीपल्स कॉंग्रेस’ने देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले. विद्यमान संरक्षण मंत्री जनरल फेंघे यांच्या जागेवर जनरल ली शेंघपू हे देशाचे संरक्षण मंत्री म्हणून सूत्रे स्विकारणार आहेत.
Iran : शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी 100 जणांना अटक, समोर आले धक्कादायक कारण…
जनरल ली शेंगफू यांच्याबरोबर देशाचे नवीन मंत्रिमंडळ देखील नियुक्त करण्यात आले आहे. चीनच्या सरकारी अदिकाऱ्यांची दर 10 वर्षांनी पेरनियुक्ती केली जात असते. या धोरणाला अनुसरून हे नवीन मंत्रिमंडळ नियुक्त करण्यात आले आहे.