मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मातोश्री आशाताई पवार (Ashatai Pawar) यांनी केलेले एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांच्या आईंनी केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे. (Ajit Pawar become CM)
अजित पवार यांच्या आई आशाताई म्हणाल्या,“अजित पवार (Ajit Pawar) आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत (Katewadi) भरपूर बदल झाले”, असे आशाताई पवार यांनी यावेळी म्हटले.
“माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या आईच्या या इच्छेबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या, “अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही.”
नेमकं काय म्हणाल्या अजित पवारांच्या आई
“अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात”असं आशाताई यावेळी म्हणाल्या.