मुंबई – आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आज पक्षाच्या मुंबईतील एका महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांनी आपल्या पुर्व नियोजित कार्यक्रमाची माहिती पक्षाला दिली होती व अनुपस्थित राहणार असल्याचे त्यांनी आधीच कळवले होते.
परंतु तरीही ही महत्वाची पक्षाची बैठक त्यांनी टाळली अशी अटकळ लावली जात असून त्या अनुषंगाने आता त्यांच्या विषयी पुन्हा विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
अजित पवार बैठकीला उपस्थित नाहीत याचा अर्थ ते पक्ष सोडून चालले आहेत असा घेतला जाऊ नये असे राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षातर्फेही स्पष्ट करण्यात आले आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला पक्षाचे अनेक आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या विषयीच्या अनेक उलटसुलट बातम्या गेले आठवडाभर येत राहिल्या. तथापि आपण जीवातजीव असे पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच राहणार आहोत असे निकराचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. परंतु तरीही त्यांच्या राजकीय भूमिकेविषयीचे तर्कवितर्क असून थांबलेले नाहीत.