पोलीस पाटील संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ
सोरतापवाडी – पोलीस पाटील संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील शिष्टमंडळाने मानधनमध्ये होणारी हेळसांड व त्यावर अर्थ मंत्रालयाकडून निधीची पूर्तता करण्यासाठी संघटना राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील यांनी निवेदन दिले.
यावेळी पवार यांनी मागण्यांसंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर, कार्यकारी अध्यक्ष साहेबराव राळे, कार्याध्यक्ष विजय कुंजीर, महिला आघाडी अध्यक्षा तृप्ती मांडेकर, कार्याध्यक्षा रोहिणी हांडे, हर्षदा संकपाळ, तनुजा कुताळ, मीना गायकवाड, मोनिका मॅडम, जिल्हा संघटक नवनाथ धुमाळ, हवेलीचे अध्यक्ष पंडित हरगुडे, शिरूरचे उपाध्यक्ष किरण काळे, खेड कार्याध्यक्ष अमोल पाचपुते, हवेलीचे कार्याध्यक्ष विजय टिळेकर, दत्तात्रय चौधरी उपस्थित होते.