तंबाखूजन्य जाहिरात थांबवण्याची, कॅन्सर पीडित चाहत्याची अजयला विनंती

बॉलिवूडचा सिंघम असणारा ‘अजय देवगण’ नेहमीच विविध विविध चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असतो. पण सध्या अजयचे काही चाहते त्याच्यावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे. राजस्थान मधील एका कॅन्सरपीडित चाहत्याने एक पाऊल पुढे जात, अजयला तंबाखूची जाहिराती न करण्याची विनंती केली आहे.

‘नानकराम’ असं या चाहत्याचे नाव असून, तो ४० वर्षांचा आहे. अजय जाहिरात करत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन नानकरामला होते. याचदरम्यान त्याला कॅन्सरने गाठले आणि नानकरामचे डोळे उघडले. तंबाखूने आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त होत असल्याची जाणीव त्याला झाली. तंबाखूमुळे कॅन्सर झाल्याचे कळताच नानकरामने स्वखर्चाने तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारे माहितीप्रत्रक छापून ती सर्वत्र वाटली. यानंतर त्याने अजयला सुद्धा अशा पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.