मुंबई – ‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण झळकणार आहेत.
राजमौलींच्या या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटाचे बजेट कोटींच्या घरात खर्च केले आहे. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. अजय देवगण या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं माहितीये? तर ही रक्कम कोट्यावधीच्या घरात आहे.
चित्रपटात अजयच्या फीचा आकडा वाचून तर तुमचे डोळे पांढरे होतील. अजयने या चित्रपटासाठी 7 दिवस शूटींग केलं आणि या 7 दिवसांसाठी त्यानं 35 कोटी रूपये मानधन घेतलं.
दरम्यान, हा चित्रपट सर्वप्रथम जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु त्याची रिलीज डेट पोस्टपॉन करण्यात आली होती. यानंतर ‘आरआरआर’ 7 जानेवारी 2022 ला रिलीज होणार होता. पण पुन्हा एकदा त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.