“रुद्रा’ वेब सीरिजमधील अजय देवगणचा फर्स्ट लुक रिलीज

मुंबई – अजय देवगण “रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतो आहे. ही वेब सीरिज ब्रिटिश सीरिज “ल्युथर’चा हिंदी रिमेक असणार आहे. अजय देवगणने आज या वेब सीरिजमधील आपला फस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

हॉटस्टारवर रिलीज होणारी ही वेबसाइट घोषित करताना आपल्याला खूप आनंद होतो आहे, असे त्याने त्याच्यामध्ये म्हटले आहे. “रुद्रा’च्या फर्स्ट लुकमध्ये अजय देवगण बांद्रा-वरळी लिंकच्या समोर उभा असलेला दिसतो आहे. 

नेहमीप्रमाणे अजय देवगण याही वेब सीरिजमध्ये पोलीसच असणार आहे. मात्र, तो खाकी वर्दीतील पोलीस नसेल, तर गुप्तहेराच्या रोलमध्ये असेल. अजय देवगणने अलीकडेच “गोबर’ या आपल्या सिनेमाचीही घोषणा केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.