बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर “महाभारत’ या बहुचर्चित आगामी चित्रपटात “कर्णाची’ भूमिका साकारणार आहे. राकेश ओमप्रकाश हे “मायथोलॉजिकल ड्रामा महाभारत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. मात्र कर्णाची भूमिका साकारणे महाकठीण काम आहे.
या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी शाहिदला संपूर्ण बॉडी ट्रान्सफ्रॉम करून कर्णाच्या लूकसाठी तयार केले जाणार आहे. सध्या शाहिद कपूरच्या आगामी “जर्सी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
जर्सी सिनेमा हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून एका प्रतिभावान पण अयशस्वी क्रिकेटपट्टू जो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि भेटवस्तू म्हणून मुलाच्या जर्सीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वयाच्या चाळीसीमध्ये क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतो.
अशी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. महाभारत हा चित्रपट 2023 ला प्रदर्शित होऊ शकतो असे संकेत निर्मात्यांन तर्फे देण्यात आले आहे.