अभिनेता-निर्माता अजय देवगण लवकरच बंगाली क्राईम थ्रीलर सीरिज “लालबाजार’ साकरत आहे. या सीरिजबाबत अजय म्हणाला, ही वेब सीरिज गुन्हेगारीच्या जगतावर आधारित आहे. परंतु ती पोलिसांच्या मानवी पैलूंचा देखील विचार करते. यातून प्रेक्षकांना त्या लोकांच्या जीवनाबद्दल माहिती मिळेल, जे रात्रंदिवस आपल्या सुरक्षिततेसाठी लढा देत असतात.
अजय म्हणतो, “मला नेहमीच अशी पात्रे साकारायला आवडतात ज्यात चांगली गोष्ट वाईटावर विजय मिळविते. आपल्या धाडसी पोलीस दलाचे जीवन अनुसरण करणे सोपे नाही आणि मी स्वत:ला भाग्यवान मानतो की मला पोलिसांच्या वर्दीत भूमिका करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे लॉकडाउनमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत आणि परिश्रम हे खूपच प्रशंसनीय आहे.त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे.
दरम्यान, ही सीरिज कोलकाताच्या प्रसिद्ध पोलीस मुख्यालयाची इमारत लालबाजारच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये कौशिक सेन, सब्यसाची चक्रवर्ती, हृर्षिता भट्ट, दिव्येंदु भट्टाचार्य आणि सुब्रत दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.