मुंबई – अभिनेता अजय देवगण अनेकदा युग आणि न्यासा या आपल्या मुलांसोबत वेळ घालवतो. नुकतंच अजयने मुलगा युगसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अजय आपल्या मुलाला हँडशेकची अनोखी स्टाईल शिकवताना पाहायला मिळतोय. सेलिब्रेटी पिता पुत्राच्या हा व्हिडिओ चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडताना दिसत आहे.
वडील-मुलाच्या नात्यातील हा सुंदर क्षण उपस्थित असलेल्या अनेकांनी पाहिला. अजय देवगणच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर जोरदार कमेंट केल्यात. पिता पुत्रामधील हृदयस्पर्शी बॉण्डिंग या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. एका सोशल मीडिया यूजरने या बाँडिंगला खूप छान म्हटले, तर दुसऱ्या यूजरने याला अप्रतिम म्हटले आहे. अनेकांनी हार्ट इमोजीं कमेंट करून पिता-पुत्र जोडीचे कौतुक केले.
अजय देवगणने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याच्या सुरुवातीला युग अजयला घट्ट मिठी मारताना दिसतो.त्यानंतर अजय युगच्या कपाळावर किस करतो आणि नंतर एक अनोखा हँडशेक केला. पुन्हा हस्तांदोलन करत अजय आपल्या मुलाला मिठी मारत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओ शेअर करत अजयने लिहिले, ‘आम्ही खास पिता-पुत्राच्या हँडशेकवर काम करतोय.’