मुंबई – झी मराठीवरील बस बाई बस हा शो चांगलाच लोकप्रिय होताना दिसतोय. खासदार सुप्रिया सुळे,अमृता फडणवीस,मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावल्यानंतर आता या शोमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्याचे समजते. पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या गप्पांचा एक प्रोमो सध्या प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचान करतोय त्यामुळे कार्यक्रमात अनेक रंजक किस्से घडत असतात. तसेच यातील प्रश्न उत्तरांचे सदर प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी सुबोध भावे यांनी पंकजा मुंडेंना थेट तुम्ही कधी आमदार फोडले आहेत का ? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी हो असं उत्तर दिल्याच प्रोमध्ये पाहायला मिळतय.
सुबोधने पंकजा मुंडे यांना कोणते आमदार आणि कधी फोडले असं विचारले असता त्या म्हणाल्या,आता सगळं सांगितलं तर एक तासाचा वेगळा एपिसोड बनवावा लागेल. त्यावर सुभोध भावे पुन्हा म्हणाला,आम्हाला चालेले आमच्याकडे खूप वेळ आहे. त्यावर भरपूर लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे,माझ्या जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. असं उत्तर पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले. तसेच त्या पुढे म्हणाल्या,”मला बाबांनी कायम बेरजेचे राजकारण करायला शिकवलं आणि राजकारणात जिंकणे महत्वाचे असते त्यामुळे सोबत आपल्याला शोभेल असे लोक घेण्याचा मी तरी प्रयत्न करते”. तसेच राष्ट्रवादीच्या मुंदडा यांना आमदार केलय यासह सुरेश धस याना देखील पक्षात घेतल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले.