नवी दिल्ली – इराणच्या धमक्यांमुळे (Iran threat) जर्मनीमधील हॅम्बुर्ग विमानतळावरील विमानसेवा आज सुमारे दिड तासांसाठी स्थगित करावी लागली होती. (Air traffic) दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपासून या विमानतळावर विमानांचे उतरणे आणि उड्डाण करण्यालाही परवानगी थांबवण्यात आली होती.
या विमानतळावर उतरणाऱ्या काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते आणि ही विमाने हॅनोवर किंवा अन्य विमानतळांवर उतरवण्यात आली होती. दिड तासांनंतर या विमानांची सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली. मात्र त्यानंतरही पुन्हा विमानसेवेला उशीर होऊ शकतो, असे विमानतळ प्रशासनाने आपल्या वेबसाईटवर म्हटले होते. (Germany)
सोमवारी सकाळी तेहरानवरून येणाऱ्या आणि हॅम्बुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानावर इराणकडून हल्ल्याची धमकी मिळाली होती. ही धमकी गांभीर्याने घेण्यात आली होती, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या धमकीचा कोणताही तपशील देण्यात आला नाही.
इराणकडून आलेले हे विमान दुपारी 12.20 वाजता हॅम्बुर्ग विमानतळावर उतरले. त्यानंतर या विमानातील प्रवासी आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली.