शेवगाव – येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये . नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा व येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी रूटमार्च काढण्यात आला .
आज सोमवारी रुटमार्चसाठी शेवगाव पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अधिकारी, वीस पोलीस अंमलदार, दहा होमगार्ड व बी.एस.एफ चे अधिकारी पोलीस निरीक्षक शैलेश मिश्रा व ४० अंमलदार हजर होते. सकाळी अकराला बोधगाव, त्यानंतर दुपारी
चापडगाव, तर दुपारी सव्वा दोनला शेवगाव शहरातील क्रांतीचौक-शिवाजी चौक-भगतसिंग चौक-नाईकवाडी मोहल्ला-धनगरगल्ली –मोची गल्ली- आंबेडकर चौक-क्रांती चौक तसेच सायंकाळी चारला अमरापुरला रुट मार्च काढण्यात आला.