पारनेर – क्रांतीकारक सेनापती बापट नाट्य करंडक स्पर्धांमुळे ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ निर्माण झाले, असे प्रतिपादन शिवतेज फाउंडेशनचे प्रमुख कृष्णाजी जगदाळे यांनी केले.
आडवाटेच पारनेर व नागेश्वर मित्र मंडळाचे वतीने आयोजित दुसऱ्या क्रांतीकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा पारनेर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी रावजी केसकर, विस्तार अधिकारी विनेश लाळगे, शिवतेज प्रतिष्ठानचे प्रमुख वकील कृष्णाजी जगदाळे, सह्याद्रीचे प्रमुख अश्विन कोल्हे, येस बँकचे उपव्यवस्थापक तेजस औटी, केंद्र प्रमुख दौलत येवले,
पारनेर तालुका कला शिक्षक संघटना अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड, साहेबराव घुले, नवनाथ झावरे, आडवाटेचे पारनेरचे प्रमुख प्रा. तुषार ठुबे, अशोक गायकवाड, महाबली मिसाळ, प्राचार्य लक्ष्मण मतकर, उपप्राचार्य आठरे, पर्यवेक्षक संजय कोल्हे, प्रा अशोक शिंदे, शिवतेज अध्यक्ष दिलीप बोरुडे, मुख्य सल्लागार गणपत जगदाळे, कार्याध्यक्ष जुबेर पठाण, उपाध्यक्ष सचिन जगदाळे, अविनाश जगदाळे, महिला कार्याध्यक्षा अंजुम पठाण, महासचिव सविता खणकर, रेखा बोरुडे, प्रभावती आवारी आदी उपस्थित होते.