अकोले – तालुक्यातील गर्दणी गावातील कोतलवाडी शिवारात शेतात गव्हाला पाणी भरत असताना सुरेश लहानु चाैधरी (वय ३५) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने पायाला बिबट्याचे नख लागून जखमी केल्याची घटना घडली.
सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान सुरेश चाैधरी हे शेतकरी गर्दणी येथील कोतलवाडी शिवारात शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होते. अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून तिथून पळ काढला. यावेळी त्याच्या पायाला बिबट्याची नख लागल्याने पायाला जखम झाली. त्यांनी तात्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात जावुन जखमेवर पट्टी करुन इंजेक्शन घेऊन उपचार घेतले आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिकांनी या परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे Ahmednagar – Farmer attacked leopard