नगर – प्रा. रामदास आडागळे स्व. लिखीत ‘संत शिरोमणी रोहीदास हे पुस्तके गेल्या वर्षभरात ५ हजार पेक्षा जास्त प्रती विविध मान्यवर, विद्यार्थी, वाचक संत रोहीदास प्रेमी यांना भेट म्हणून दिल्या आहेत. संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा. आडागळे यांंनी पुस्तक वाटून संत रोहिदास यांना अभिवादन केले.
“संत रोहिदासांचे उतुंग असे कार्य व त्यानी सामान्य माणसांना सांगितलेल्या जगण्याचा सत्वसील मार्ग, मानवसेवा, ईश्वर भक्ती, कर्मकांड विरोध, या गोष्टीचा प्रचार व प्रसार या पुस्तक भेट देण्यामागचा असल्याचं प्रा.अडागळे यांनी सांगितले. हिंदी भाषीक संत असलेले संत रोहिदास यांचे मराठी भाषेत दुर्मिळ लिखाण असल्याचे पाहवयास मिळते. त्या सर्व गोष्टींचा विचार करता संत रोहिदास रोहिदासांचे मराठी भाषेत त्यांची कार्याची महती लोकांना वाचनासाठी उपलव्ध होणे गरजेचे होते. याच गोष्टीचा विचार करता संत रोहिदास यांच्या जीवन व कार्य या विषय लिखान प्रा. अडागळे यांनी केले.