अहमदनगर : नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी धनवटे, सचिवपदी माने

जिल्हा परिषद अहमदनगर नर्सेस संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर
नगर (प्रतिनिधी) –
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अहमदनगर नर्सेस संघटनेची नुकतीच बैठक ऑनलाइन पार पडली. महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या अध्यक्षा शोभा खैरनार व सचिव लता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकित अहमदनगर जिल्ह्याची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अहमदनगर नसस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील वंदना धनवटे व सचिवपदी मंदा माने यांची बिनविरोध निवड झाली.

परिचारिकांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. अहमदनगर नर्सेस संघटनेची नुतन कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्षा – वंदना धनवटे, कार्याध्यक्षा- संगीता कचरे, कोषाध्यक्षा- आशा बनसोडे, सचिव- मंदा माने, उपाध्यक्षा- कांता जाधव, रत्नमाला धिमटे, सरला कदम, विद्या निर्हाळी, उषा देशमुख, सहसचिव- छाया नन्नवरे, संजीवनी दाते, शोभा वडेपल्ली, मंगल शेळके, कमल राजगिरे, जिल्हा संघटक- श्‍वेता डहाळे, प्रमिला वैजापूरकर, हेमा कांबळे, मनीषा जाधव, उषा आदमाने, प्रमुख सल्लागार- प्रतिभा फळे, शारदा डोणे, शारदा दावणे. कार्यकारणीवर या नुतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली.

नुतन अध्यक्षा वंदना धनवटे यांनी नुतन कार्यकारणी नर्सेस भिगिनींचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द राहणार असून, त्यांच्या न्याय, हक्कासाठी लढा देणार असल्याचे सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील नर्सेस मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. या नुतन पदाधिकाऱ्यांचा जय हिंद सैनिक सेवा फांउडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.