चांदा – नेवासा तालुक्यातील चांदा येथे भारत संकल्प यात्रेचे चांदा बस स्टँड परिसरात मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, सरपंच सुनंदा दहातोंडे व भाजपाचे जिल्हा सचिव कैलास दहातोंडे यांच्याहस्ते हार घालून व श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहित उपस्थित नागरिकांना देण्यात आली. उपस्थितांना संकल्प विकसित भारताची शपथ दिली तसेच नागरिकांनी शासकीय विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुरकुटे यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच वर्षा जावळे, कैलास दहातोंडे , भाजपाचे तालुका उपाध्यक्ष किरण जावळे, कृषी अधिकारी नंदकुमार दहातोंडे, सागर जावळे, मंडल अधिकारी व्ही.एम. दगडखैर, का. तलाठी एन.पी. वाडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रजनीकांत पुंड, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.आडसुळ, ग्रामविकास अधिकारी डी.जी.आरगडे, डी.व्ही फोपसे, पर्यवेक्षिका एस.आर.दळे ,आदी अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.