अहमदनगर – महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर येथे महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ उद्या (शनिवारी) आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे असतील.
यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. प्रा.राम शिंदे, आ. संग्राम जगताप उपस्थित राहणार आहे. 47 कोटी 86 लाख रुपये खर्च करून हे महसूल भवन बांधण्यात येणार असून जिल्ह्यासाठी हे भवन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.नगर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता, तहसील ऑफिसजवळ टीव्ही सेंटर येथे होणार आहे. या महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास महायुतीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारंभाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.