कोल्हार – श्रीरामपूर तालुक्यातील ममदापूर आता कत्तलखान्याचे केंद्र बनले असून बुधवारी शिर्डी, श्रीरामपूर, लोणी पोलीस व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकला असता कत्तलीसाठी आणलेल्या गायी आढळल्या. येथे धाड टाकताच येथील सराईत गुन्हेगारांनी गोरक्षक व थेट पोलिसांवर गोळीबार करून त्यांच्या वाहनांची मोडतोड करून धारदार शास्त्रने वार करण्याची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. लोणी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, ५ आरोपींना अटक केली आहे.
साईराज बेंद्रे हा युवक आरोपींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. निजाम कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, साजिद कुरेशी, नसीम कुरेशी, समीर कुरेशी, जमीर कुरेशी, मुनिर कुरेशी, अजीज शहा, शकिर शहा, इम्रान अब्दुल शेख, अन्सार इब्राहिम शेख, नजीर शकिर शेख, मुदतसर यासिन शेख, हुसेन फकीर मोहम्मद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पाच जणांना लोणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (रा. तांदुळनेर, ता. राहुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बुधवारी सहा तारखेस लोणीच्या बाजारातून काही गायी कत्तलीसाठी ममदापूर येथे नेत असल्याची बाब गोरक्षकांच्या नजरेस आली. याबाबत त्यांनी लोणी पोलिसात माहिती देत त्यांचे सोबत गेले. ममदापूर येथील कसाई मोहल्ल्याजवळ गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असलेली जागा पोलिसांना दाखविली. याचाच राग येऊन आरोपींनी गोरक्षकांवर तलवार, कोयते व काठ्यांनी सशस्त्र हल्ला केला. परस्थिती बिघडून जमाव उग्र झाल्याने सोबत असलेल्या पोलिसांनी गोरक्षकांना बचावले.
मात्र, यामध्ये साईराज बेंद्रे गंभीर जखमी झाला. त्यास अतिदक्षता विभागात हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी आरोपींनी फायरिंग करून दहशत निर्माण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर लोणी, शिर्डी व श्रीरामपूर पोलिसांनी येथे कारवाई करून पाच आरोपींना ताब्यात घेतले. अनेक वेळा कारवाई होऊनही निर्ढावलेले गोमांस तस्कर त्यास दाद देण्यास तयार नाहीत. वरील १६ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्ष्क युवराज आठरे करीत आहेत.