फलटण – माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱयाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की, माहेरून चारचाकी गाडीचे हप्ते भरण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, लग्नात आमचा मानपान केला नाही.
तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती सुरज लक्ष्मण सोनवलकर, सासू वंदना लक्ष्मण सोनवलकर आणि सासरे लक्ष्मण मारुती सोनवलकर यांनी आपापसात संगनमत करून हाताने लाथा बुक्क्याने मारहाण करून उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाचहाट छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून सौ. निकिता सुरज सोनवलकर (वय २५, रा. दुधेबावी ता. फलटण सध्या रा. मिरढे ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस नाईक यादव तपास करीत आहेत.