नगर (प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे आज अखेर 13 हजार 587 मतदार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 9 हजार 559 पुरुष तर 4 हजार 18 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात कार्यरत शिक्षक संख्या एकूण 15 हजार 190 आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारांसाठी माध्यमिक आणि महाविद्यालयातील शिक्षक मतदार होण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यात माध्यमिक आणि महाविद्यालयांची संख्या 1 हजार 239 आहे. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मतदार यादीचे वितरण करण्यात आले.
तालुकानिहाय अर्ज
अकोले 974, संगमनेर: 11 हजार 737, राहाता : 1 हजार 182, कोपरगाव : 1 हजार 514, श्रीरामपूर : 809, नेवासे 822, शेवगाव : 680, पाथर्डी 864, राहुरी : 944, पारनेर : 583, नगर : 1 हजार 875, श्रीगोंदे : 743, कर्जत : 590, जामखेड : 270 असे अर्ज प्राप्त झाले आहेत.