लंडन – ब्रिटनमध्ये विविध गुन्ह्यांखाली कारावासात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. त्याच प्रयोगाचा एक भाग म्हणून आता ब्रिटनमधील पहिले स्मार्ट जेल खुले करण्यात आले आहे. या स्मार्ट जेलमध्ये कैद्यांना शिक्षण दिले जाणार असून शिक्षा संपल्यावर बाहेर गेल्यावर त्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या स्मार्ट जेलमध्ये कैद्यांना संगणक आणि इंटरनेट यंत्रणाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इंग्लंड मधील नॉर्दनशायर परिसरात वेलिंग बोरो येथील हर मॅजेस्टी प्रिझनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांच्या रहिवाशी स्थानाला तुरुंग न म्हणता खोल्या असे संबोधण्यात येणार असून कैद्यांना रहिवासी असे म्हणण्यात येणार आहे.
या कारावासात सतराशे कैद्यांची सोय होणार असून पुनर्वसन प्रक्रियेमध्ये कैद्यांना संगणक आणि टॅबलेट उपलब्ध करून दिले जाणार आहे हे कैदी आपली शिक्षा संपल्यावर बाहेरच्या जगात गेल्यानंतर त्यांना रोजगार मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य प्रकारचे कौशल्य आधारित प्रशिक्षण या आधुनिक तुरुंगामध्ये दिले जाणार आहे या प्रकारचे कौशल्य आधारित प्रशिक्षण त्यांना दिले तर त्यांना बाहेर गेल्यानंतर पुन्हा गुन्हे करायची गरज भासणार नाही
रोजगार उपलब्ध होईल या तत्त्वावर हा आधुनिक तुरुंग सुरू करण्यात आला आहे या तुरुंगात शिक्षण प्रशिक्षणा सोबत त्यांना खेळही उपलब्ध करून देण्यात आलेल्या टेबलटेनिस बॅडमिंटन स्नूकर हे खेळ कैदी या तुरुंगात खेळू शकतात या तुरूंगामध्ये एकूण चोवीस वर्कशॉप बांधण्यात आली असून बहुतेक खोल्या वर्गाप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत या वर्कशॉपमध्येच कैद्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे
जे कैदी मादक द्रव्याच्या आहारी गेले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा या स्मार्ट जेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 200 कैद्यांच्या एकावेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे आगामी कालावधीमध्ये अशाच प्रकारचे स्मार्ट जेल इतरत्र उभारण्यात येणार आहेत.