नवी दिल्ली – भारतीय नौदलाने शनिवारी ब्रम्होस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, ही चाचणी यशस्वी ठरली असे नौदलाने म्हटले आहे.
नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चाचणीच्या वेळी क्षेपणास्त्राने आपले निर्धारीत लक्ष्य अचूकतेने गाठले.त्यामुळे या क्षेपणास्त्राची प्रत्यक्ष वापरातील क्षमता आता सिद्ध झाल्या आहेत.
आत्तापर्यंत विविध वातावरणात या क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातून क्षेपणास्त्राच्या सर्व अपेक्षा पुर्ण झाल्या आहेत. ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे जे भारत-रशियन संयुक्त उपक्रमाद्वारे तयार करण्यात आले आहे.
भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण क्षेत्रात मोठी भागीदारी आहे. त्या भागीदारीतूनच हे नवीन तंत्रज्ञानाचे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.