मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पंरतु मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आता आणखी एका बड्या नेत्याला गळ घालण्याचा प्रयत्न बीआरएसकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीआरसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. परंतु,पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नारकाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी बोलताना,’गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचेही राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआरच्या सर्व ऑफर नाकारल्या असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच आमच्या सोबत असणाऱ्या काहींना बीआरएस फोडत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान, बीआरएसने राजू शेट्टी यांच्याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने पक्षात येण्याची ऑफर दिली होती तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची ऑफर दिली होती. तर या ऑफरवरती पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद न दिल्याने आता बीआरएसने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.