मुंबई – दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री असिन बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण आज अचानक तिच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
अभिनेत्री असीनने पती राहुल शर्मासोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून हटवले आहे. असीनच्या इन्स्टाग्रामवरून तिच्या पतीसोबतचे सर्व फोटो हटवल्यानंतर लोक म्हणतात की,’ त्या दोघांमध्ये काही ठीक चालत नाहीये…! ‘ एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, असिनने बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर स्वतःला फिल्मी जगापासून दूर केले होते. ती क्वचितच चित्रपट, चित्रपट पार्टी आणि इतर कार्यक्रमांचा भाग बनली. बऱ्याच दिवसांपासून शोबिजपासून दूर असलेल्या असिनने आता तिच्या पतीसोबतच्या लग्नाच्या फोटोंसह प्रत्येक फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केला आहे.
अशात, अभिनेत्रीच्या प्रोफाइलवर तिच्या 5 वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची फक्त फोटो दिसत आहे. अभिनेत्री असीन घटस्फोट आणि तिचा पती राहुल यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तसेच, असीनने पती राहुलसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावरून का काढून टाकले हेही स्पष्ट झालेले नाही.
2001 मध्ये नरेंद्रन माकन जयकांथा वाका या मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या असीनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे मालक राहुल शर्मासोबत लग्न केले होते. त्यानंतर असिन आणि राहुल 2017 मध्ये एका मुलीचे पालक झाले. असिन शेवटची ऑल इज वेल (2015) या चित्रपटात दिसली होती.