Naveen Jindal BJP Candidate| लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने काल रविवारी पाचवी यादी जाहीर केली. यात काहींचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनाही यावेळी संधी देण्यात आली आहे. यात प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या नावाचा समावेश आहे. नवीन जिंदाल यांनी रविवारीच काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवार म्हणून घोषित केले.
भाजपमध्ये प्रवेश करताच लोकसभा उमेदवारी जाहीर
भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात विनोद तावडे यांनी नवीन जिंदल भाजपमध्ये येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीत नवीन जिंदल यांचे नाव होते. हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवीन जिंदल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा रविवारीच दिला. त्यानंतर काही तासात त्यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत झळकले.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: Here’s what Industrialist and BJP leader Naveen Jindal (@MPNaveenJindal) said on the announcement of his candidature from Haryana’s Kurukshetra in party’s fifth list of 111 candidates.
“I consider myself fortunate that BJP has given me the… pic.twitter.com/y7VB5ZxULy
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2024
कोण आहेत नवीन जिंदल?
नवीन जिंदल हे वरिष्ठ काँग्रेस नेते ओ. पी. जिंदल यांचे पुत्र आहेत. ते काँग्रेसचे माजी खासदार होते. जिंदाल यांनी 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेस खासदार म्हणून लोकसभेत कुरुक्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. देशातील मोठ्या उद्योजकांपैकी नवीन जिंदल एक आहेत. हरयाणा सरकारमध्ये त्यांनी उर्जा मंत्री म्हणूनही काम केलं आहे.
रणजीत सिंह चौटाला
त्याचवेळी हरियाणातील सिरसा येथील रानिया येथील अपक्ष आमदार आणि हरियाणा सरकारमधील मंत्री रणजीत चौटाला यांनीही रविवारी संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना हिस्सारमधून उमेदवारी दिली आहे. हिसारचे विद्यमान खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
78 वर्षीय रणजीत सिंह चौटाला यांनी हरियाणातील सिरसा येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. ते माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे पुत्र आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे भाऊ आहेत.
हेही वाचा:
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताच झाले लोकसभेचे उमेदवार; प्रसिद्ध उद्योगपतीला मिळाली मोठी संधी