नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल यांचा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत विवाह झाला त्यानंतर नवदाम्पत्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. दरम्यान, केएल राहुलनंतर आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे त्याने भस्म आरतीमध्येही भाग घेतला. अक्षर हा काही दिवसांपूर्वीच त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्नबंधनात अडकला. ज्यानंतर आता तो देवदर्शन करताना दिसला आहे.
Ujjain Indian cricketer Axar Patel along with wife Meha participated in Bhasma Aarti at Mahakal temple.@akshar2026 #aksharpatel #axarpatel #mahakal #अक्षरपटेल #महाकालेश्वर pic.twitter.com/OtFDDfIUtB
— Priyathosh Agnihamsa (@priyathosh6447) February 27, 2023
दरम्यान आता अक्षर पटेल महाकालच्या दरबारात पूजा करतानाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षर पटेलने यावेळी, तो 5 वर्षांपूर्वी भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला पोहोचला होता, पण भस्म आरती पाहू शकला नाही.
तेव्हापासून त्याला भस्म आरती पाहण्याची इच्छा होती. आज त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. अक्षर आणि त्याची पत्नी मेहा या भस्म आरतीत सहभागी झाल्यानंतर खूप आनंदी आणि समाधानी दिसत होते.