शेतकरी आंदोलन : भाईजानचे मत ऐकताच चाहते म्हणाले,’दिल में आता है, समझ में नहीं!”

नवी दिल्ली  – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं.

यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. सध्या ट्विटरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या गटामध्ये आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्यामध्ये चांगला वाद सुरु आहे. हा वाद सुरूच असतांना याच संदर्भात  बॉलीवूडचे भाईजान सलमान खान यांनी  पत्रकारांशी बोलतांना आपलं मत व्यक्त केलं आहे.

या मुद्यावर देशातील शेतकरी आंदोलनावर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संने आपलं मत व्यक्त केलंय. त्यावर, आपली काय भूमिका? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावर  सलमानने म्हणाला  ,’जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, उचित व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावे, सर्वांसाठी ! असे उत्तर सलमान खानने मीडियाशी बोलताना दिले. त्यामुळे, सलमानने दिलेल्या उत्तराचा नेमका काय  अर्थ लावायचा असा प्रश्न पडला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना किक चित्रपटातील त्यांचा फेमस डायलॉग आठवला  आहे ,’मेरे बारे में इतना मत सोचना…दिल में आता हूं, समझ में नहीं!’

  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.