नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळीही रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ‘जैसे थे’च ठेवण्यात आले आहेत.
रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो दर हे ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर एमएसएफ आणि बँक रेटमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के इतका निर्धारित करण्यात आला आहे. आर्थिक पाहणी अहवालात याचा दर ११ टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
MPC (Monetary Policy Committee) voted unanimously to leave policy repo rates unchanged at 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/PUDdF25OOe
— ANI (@ANI) February 5, 2021
रेपो रेट म्हणजे काय ?
सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.