नवी दिल्ली – जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्लीचा समावेश असल्याचे मत स्वित्झर्लंड हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवड्याच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या सीमेवरील शेतांमध्ये जळणारी पहाटी आणि दिवाळीतील फटाक्यांमुळे राजधानीतील प्रदुषण अत्यंत धोकादायक बिंदूवर पोहचले आहे. हवा विषारी झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांनी दिल्लीत सात दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.
तसेच राजधानी दिल्लीनंतर आता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर आणि मुझफ्फरनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गौतम बुद्ध नगर येथील डीएम यांनी 21 नोव्हेंबरपर्यंत गौतम बुद्ध नगरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू असतील. येथे गुरुग्रामसह दिल्ली-एनसीआरमधील सर्व भागात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.