मंचर – मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त शिवसैनिकांनी आदरांजली अर्पण केली. आंबेगाव तालुका युवासेना समन्वयक सुनील गवारी, तुकाराम भोर, दशरथ मेंगडे यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शाखाप्रमुख भास्कर मेंगडे, युवाअधिकारी गणेश मेंगडे, ज्येष्ठ शिवसैनिक दादाभाऊ मेंगडे, तुळशीराम गवारी, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ मेंगडे, माजी सरपंच दिलीप रणपिसे, सूर्यकांत मेंगडे, सुयोग मेंगडे, अंकुश मेंगडे, अमोल मेंगडे, रामचंद्र चक्कर यांसह
शिवसैनिक उपस्थित होते. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचे काम स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केले, अशा शब्दांत सुनील गवारी यांनी ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पेठ येथे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पेठ (ता. आंबेगाव) येथील शाखेमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यवेळी तालुकाप्रमुख दिलीप पवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याबरोबरच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकला. यावेळी अशोक राक्षे, तुषार पातकर, नरेंद्र पवळे, सदा गुंजाळ, अनिस तांबोळी, पाडुरंग उढाणे, प्रकाश काळे, हनुमंत नेटके उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ओवी तुषार पातकर या छोट्या विद्यार्थिनींनी स्वरचित कवितेद्वारे बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. यावेळी शिक्षक नारायण बनकर, सचिन तोडकर, नवनाथ भूमकर, रवींद्र वानखेडे, विजया पोखरकर, कमल सिनलकर, योगिता डोंगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.