नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर आणि कपड्यांच्या रंगावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या बोल्ड डान्स स्टेप्सला आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्यामुळे ट्रोल केले जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असे सांगितले आहे.
चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता आणखी एका अभिनेत्री भगव्या रंगाचे कपडे परिधआन करून व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता सनी लिओनीने भगव्या रंगाचीच बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
View this post on Instagram
सनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनारी पाण्यातच झोपलेली दिसत असून, विविध पोझ देत कॅमेरामॅन सनीचे फोटो काढत असल्याचं दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हिलाही बॉयकॉट करा, बॉयकॉट सनी लिओनी, भगव्या रंगाचे कपडे अश्या अनेक कमेंट या व्हिडिओ खाली करण्यात आल्यात आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.