Big Bash League 2023-24 Toss With Bat : सध्या ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग 2023-24 मध्ये एकामागून एक ड्रामा पाहायला मिळत आहे. यापूर्वी खेळपट्टीच्या खराब स्थितीमुळे सामना रद्द करण्यात आला होता आणि आता सामन्याच्या टाॅससाठी नाणे नव्हे तर बॅटचा वापर करण्यात आला. स्पर्धेतील सहावा साखळी सामना ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर यांच्यात मनुका ओव्हल येथे खेळला गेला, ज्यामध्ये टाॅस हा बॅटच्या मदतीने करण्यात आला.
बॅटने टाॅस करणे ही बाब दोन्ही संघांसाठी धक्कादायक होती. कारण टॉससाठी फेकलेली बॅट जमिनीवर उभी पडली, त्यामुळे निर्णय कोणाच्याही बाजूने गेला नाही. त्यानंतर नाणेफेकसाठी पुन्हा बॅट फेकण्यात आली आणि सिडनी थंडर्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टाॅससाठी बॅट फेकल्याचा व्हिडिओ बिग बॅश लीगच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे.
If at first you don’t succeed… 😅 #BBL13 pic.twitter.com/ofryum3gY4
— KFC Big Bash League (@BBL) December 12, 2023
दरम्यान, बिग बॅश लीगच्या (BBL 2023-24) 13व्या हंगामातील सहाव्या सामन्यात सिडनी थंडर्सला ब्रिस्बेन हीटविरुद्ध 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीटने 20 षटकांत 7 बाद 151 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून सिडनी थंडर्सचा संघ पूर्ण षटकहे खेळू शकला नाही आणि 19 षटकांत 131 धावा करून सर्वबाद झाला. ब्रिस्बेन हीटच्या मायकेल स्वेपसन याने 26 धावा देत 2 बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
याआधी खराब खेळपट्टीमुळे सामना रद्द…
याआधी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील स्पर्धेतील चौथा सामना खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता. खेळपट्टीच्या दुरवस्थेमुळे सामना रद्द करण्यात आला तेव्हा पहिल्या डावातील केवळ 6.5 षटके टाकण्यात आली.
#BBL13: ‘बिग बॅश लीग’मध्ये 6 व्या षटकामध्येच रद्द करावा लागला सामना; जाणून घ्या, नेमकं काय घडलं….
सामन्यादरम्यान, खेळपट्टीमध्ये असमान उसळी दिसली त्यामुळे फलंदाजांना खेळणे मुश्किल आणि धोकादायक झाले. यामुळे फलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता होती.