OTT Platform : आजच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म हे सर्वात प्रभावशाली आणि पूर्ण मनोरंजन करणारे व्यासपीठ ठरले आहे. या प्लॅटफॉर्मवर बिंधासपणे सर्व प्रकारचे विषय दाखविले जातात आणि नवीन चेहरे दार ठोठावत आहेत. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये चित्रपट केले असतील किंवा नसतील, परंतु हे स्टार्स OTT प्लॅटफॉर्मचे प्रसिद्ध चेहरे बनले आहेत.
त्यात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर सतत लोकप्रिय असतात. त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे आणि आपल्या खास फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतात. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल….
हर्षिता गौर (Harshita Gaur) –
पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांच्या ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसणारी अभिनेत्री हर्षिता गौर सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. कधी अभिनेत्री साडीतील फोटो शेअर करते तर कधी वेस्टर्न लूकमध्ये तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
अनुप्रिया गोयनका (Anupriya Goenka) –
‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘आश्रम’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अनुप्रिया गोयनका सोशल मीडियावरही व्हायरल होत असते. चाहत्यांना तिची देसी शैली खूप आवडते आणि ती OTT वर देखील निर्मात्यांची पहिली निवड असते.
अदिति पोहनकर (Aaditi Pohankar) –
अदिति पोहनकर ही ओटीटी जगतातील नवीन चेहरा आहे. ती विजय वर्मा फेम वेब सिरीज ‘शी’ मध्ये दिसली होती. या मालिकेत तिची प्रमुख भूमिका होती. आज ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि तिच्या हटके लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे.
शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) –
शोभिता धुलिपाला OTT जगाची फॅशन आयकॉन आहे. तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. हे केवळ तिच्या प्रोजेक्ट्समधील पात्रांमध्येच नाही तर वास्तविक जीवनातही दिसून येते. शोभिता धुलिपालाचे सोशल मीडियावरील फोटो याचा पुरावा आहेत. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 5.1 मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत.
त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) –
त्रिधा चौधरीने तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचे तीन मिलियन फॉलोअर्स आहेत. ती बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेब सिरीजमधील बोल्ड भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती.