Big Bash League 2023-24, Brisbane Heat vs Melbourne Stars : बिग बॅश लीग 2023-24 सुरू झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना मेलबर्न स्टार्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात होता. #BBL13 या सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला (Melbourne Stars) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ब्रिस्बेन हीटने 103 धावांनी विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे मॅक्सवेलसोबत मार्कस स्टॉइनिसही फ्लॉप झाला. मॅक्सवेल अवघ्या 23 धावा करून बाद झाला. तर स्टॉइनिस 2 धावा करून तंबूत माघारी परतला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीटने 3 गडी गमावून 214 धावा केल्या. यादरम्यान कॉलिन मुनरोने (Colin Munro) शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद 99 धावा केल्या. मुनरोने 61 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 5 षटकार मारले. कर्णधार ख्वाजाने 19 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 4 चौकार मारले. लॅबुशेनने 30 धावा केल्या. मॅक्स ब्रायंटने नाबाद 15 धावा केल्या.
20 thousand happy @HeatBBL fans at the Gabba tonight! 🔥 #BBL13 pic.twitter.com/1XireZN5np
— KFC Big Bash League (@BBL) December 7, 2023
लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्स संघ 15.1 षटकांत सर्वबाद 111 धावाच करू शकला. यादरम्यान कर्णधार मॅक्सवेल 23 धावा करून बाद झाला. त्याने 14 चेंडू सामना करताना 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. जो बर्न्सने 22 धावांचे योगदान दिले. मार्कस स्टॉइनिस 3 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. मॅक्सवेलबद्दल बोलायचे झाले तर 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याची खूप चर्चा झाली होती.
ब्रिस्बेन हीटकडून मिचेल स्वेपनने 3 बळी घेतले. त्याने 3.1 षटकात 23 धावा दिल्या. मिचेल नेसरने 3 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. जेवियरने 2 बळी घेतले. जॉन्सन आणि कुहनमैन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
बिग बॅश लीगच्या या हंगामातील पुढील सामना उद्या सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. यानंतर शनिवारी अॅडलेड आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात सामना होणार आहे. ब्रिस्बेन हीटने यंदाच्या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यानी एक सामना खेळला आणि जिंकला. त्याचे 2 गुण आहेत.