Best Catch Of Cricket History : क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक शानदार झेल पाहिले असतील. पण एक झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहून चाहतेच नव्हे सर्वच क्रिकेटचे जाणकार देखील आश्चर्यचकित झाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा झेल घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ..
या व्हिडिओमध्ये फलंदाज सरळ समोर उंच असा शॉट मारतो. पण सर्कलजवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक (फील्डर) झेल पकडण्यासाठी उलट दिशेने पाठीमागे बरेच अंतर वेगाने धावतो आणि अगदी सीमारेषेजवळ (बाउंड्रीलाईन) जात झेल घेतो.
WHAT A CATCH…..!!!!! 🔥🫡
– One of the greatest fielding efforts in cricket history. [Rob Moody]pic.twitter.com/1ScwmXBz5P
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
या झेलची खास गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षक(फील्डर) उभ्या असलेल्या जागेपासून खूप अंतर मागे धावतो आणि झेप घेऊन झेल पकडतो. यादरम्यान झेल पकडताना त्याच्या लक्षात येते की, सीमारेषेला(बाउंड्री लाईन) आपला स्पर्श होऊ शकतो. हे लक्षात येताच लगेचच तो चेंडू वरच्या दिशेने मागे फेकतो. मग जवळच उभा असलेला क्षेत्ररक्षक सहज हा झेल घेतो.
WHAT A CATCH…..!!!!! 🔥🫡
– One of the greatest fielding efforts in cricket history. [Rob Moody]pic.twitter.com/1ScwmXBz5P
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
फील्डरने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल…
या आश्चर्यकारक झेलनंतर फलंदाजासह चाहत्यांना धक्काच बसला. काही चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण खूप अवघड वाटणारा झेल क्षेत्ररक्षकाने आधीच घेतला होता. अशाप्रकारे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पण क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने मागे धावत झेल पकडला त्यावर फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसणे सोपे नव्हते. सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत असा झेल पाहिला नाही. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात आश्चर्यकारक झेल आहे.