जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या डावात श्रीलंके 396 धावा केल्या होत्या. याच डावात त्यांच्या चार खेळाडूंना दुखापतही झाली होती. श्रीलंकेच्या धावसंख्येला उत्तर देताना यजमान दक्षिण आफ्रिकेने 621 धावांचा डोंगर उभारला होता.
दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसे यश आले नाही व त्यांचा डाव 180 धावांवर संपला आणि दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 45 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने 2 बाद 65 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचा डाव 46.1 षटकांत 180 धावसंख्येवर संपला.
श्रीलंकेकडून कुशल परेराने 64 तर, वनिंदू हसरंगाने 59 धावांची खेळी केली. मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्जिडी, अनरिच नोर्जे, विआन मुल्डर व लुथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.