नवी दिल्ली – पाकिस्तान महागाई आणि इतर गोष्टींमुळे अडचणीत आलेला असताना पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी एका खेळाडूवर बंदी घालण्यात आली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानी प्लेयर आसिफ आफ्रिदी आहे. भ्रष्टाचार विरोधी आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
आफ्रिदीवर घातलेली ही बंदी 22 सप्टेंबर 2022 पासूनच सुरु झाली आहे.त्यावेळी घातलेली ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची होती. मात्र आता पीसीबीने याबाबत एक निवेदन जाही केले आहे. भ्रष्टाचार केला कि नाही याचा अहवाल न दिल्याने आफ़िदीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अनवधानाने आपल्याकडून संहितेचे उल्लंघन झाल्याचा दावा करत आफ्रिदीने आपल्या प्रकरणात सहानुभूतीने वागण्याची विनंति केली.अखेर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आफ्रिदीवर 12 सप्टेंबर 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. किंबहुना पाकिस्तानी खेळाडूंचे नाव एखाद्या वादग्रस्त प्रकरणात यापूर्वी देखील आलेले आहे. यामध्ये सलमान बट, मोहम्मद आसिफ, मोहम्मद अमीर आणि सलीम मलिक अशा नावांचा समावेश आहे. तर वकार युनूस सारख्या दिग्गज खेळाडूचे देखील फिक्सिंग सारख्या प्रकरणांमध्ये नाव समोर आलेले होते.