काबुल – अफगाणिस्तानचे राष्ट्पती अशरफ घनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजलें आहे. याशिवाय, राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्सही पोहोचली आहेत. ते अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होऊ शकतात.
अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तालिबान सत्ता हस्तांतरणाच्या तयारीसाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी जात आहेत. या अधिकाऱ्याने रविवारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या बैठकीचा उद्देश शांततापूर्ण पद्धतीने तालिबानला सत्ता सोपवणे आहे.
तालिबानने सांगितले की, बळजबरीने सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा हेतू नाही. तत्पूर्वी, तालिबान लढाऊंनी रविवारी राजधानी काबुलच्या बाहेरील बाजूस सर्व बाजूंनी घुसखोरी सुरू केली. काबुलच्या बाहेर मोठ्या संख्येने तालिबान लढाऊ उपस्थित आहेत आणि काबूलच्या आकाशात धूर आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
कोणालाही इजा पोहोचवण्याच आमचा हेतू नाही : तालिबान
दुसरीकडे, तालिबानने एक निवेदन जारी करून सांगितले की ते चर्चेद्वारे शांततेने काबूलमध्ये प्रवेश करणार आहेत. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नाही. तालिबानने पुढे म्हटले की, सरकारशी चर्चा सुरू आहे, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही.
तालिबानने म्हटले आहे की, “कोणाच्याही जिवाला, मालमत्तेला, सन्मानाला हानी पोहचणार नाही आणि काबूलमधील नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही.”
Taliban negotiators are heading to Afghan presidential palace to prepare for a ‘transfer’ of power, reports Associated Press quoting Afghan official
— ANI (@ANI) August 15, 2021
रविवारी जलालाबाद ताब्यात घेतले
राजधानी काबुलच्या बाहेरील भागात प्रवेश करण्यापूर्वी अतिरेकी गटाने रविवारी सकाळी जलालाबादवर कब्जा केला. काबूल व्यतिरिक्त जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबान पकडीतून वाचले होते. हे पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे.