Pune : वकिलांनी अधिक संख्येने आजीव सभासद व्हावे – पुणे बार असोसिएशनचे आवाहन

पुणे – वकिलांनी अधिक संख्येने पुणे बार असोसिएशनचे आजीव सभासदत्व हावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनच्या कार्यकारिणीने केले आहे. आतापर्यंत सभासदत्वासाठी सुमारे 1000 वकिलांनी अर्ज घेतल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक आणि सचिव ऍड. विकास बाबर यांनी केले आहे.

पुणे बार असोसिएशनच्या 11 मार्च 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजुर केला. मात्र, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे याची अंमलबजावणी करण्यास सुमारे 11 महिन्याचा विलंब झाला. पुणे बार असोसिएशन ही संस्था पुणे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे.

घटनेमध्ये असोसिएशनच्या आजीव सभासदत्वाची तरतूद आहे. त्याची नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. सभासदत्व होऊ इच्छिणाऱ्या वकिलांनी दोन हजार रक्कम रुपये भरुन सभासदत्व घ्यायचे आहे. त्याकरिता बार कार्यकारिणीने शिवाजीनगर न्यायालय आवारातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखेमध्ये पुणे बार असोसिएशनचे चालू खाते उघडले आहे.

त्यास बॅंकेकडून क्‍युआर कोडही प्राप्त झालेला आहे. पुणे बार असोसिएशनच्या सभासद वकिलांनी 11 सकाळी ते सांयकाळी 5 यावेळेत बारच्या ऑफिस मधील उपलब्ध फॉर्म्स भरुन देऊन आणि बार असोसिएशनचे खात्यामध्ये रक्कम भरणे अपेक्षित आहे.

त्याकरिता इच्छुक वकिलांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शिवाजीनगर न्यायालय शाखेतील पुणे बार असोसिएशन, चालू खाते क्रमांक 39989765309 (IFSC code-SBIN0061579) या खात्यामध्ये गुगल पे, फोन पे, आरटीजीएस, चेक, डीडी किंवा पे स्लिप रक्कम भरून त्याची पोच पुणे बार असोसिएशनच्या ऑफिस मध्ये आणून दिल्यास इच्छुकांचे अर्ज मंजूर होईल. त्यांना आजीव सभासदत्व मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.