मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील कोरोना पॉझिटिव्ह

इस्लामपूर  – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव तसेच सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती आपल्या ट्वीटद्वारे दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मंत्री पाटील हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून ते सध्या मुंबई येथे क्वारंटाईन आहेत. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतीक यांनी तात्काळ स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले होते. आता प्रतिक यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी मी विलगिकरणात आहे. काळजी नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.’ मंत्री पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या अनुपस्थितीत प्रतीक पाटील संपूर्ण मतदारसंघात सक्रिय असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.