पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजप कायदा आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर मिडिया प्रमुखपदी अॅड. ऋ षिकेश कामथे यांची उपाध्यक्ष जनसंपर्कपदी अॅड. रुपाली वाघेरे यांची तर नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप व भाजप कायदा आघाडी अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी ही नियुक्ती केली आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भाजपची ध्येयधोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकार्यांनी शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदर महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांचे आभार मानले.