मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यामध्ये आता महाराष्ट्रातील अनेक व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत.
काही लोकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली तर, काहींच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 97 व्हीआयपीना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत आता बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Police: Security cover of Aaditya Thackeray (Shiv Sena leader) has been upgraded from Y+ to Z Category, after a threat perception assessment. pic.twitter.com/Q0w2oOYRKo
— ANI (@ANI) December 25, 2019
दरम्यान, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी Y+ सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता त्यांना Z सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
तर, सचिन तेंडुलकर यांना आधी X सुरक्षा देण्यात आली होती. ती आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सचिनसोबत यापुढे 24 तास पोलीस कर्मचारी राहणार नसून एस्कॉर्ट सर्व्हीस पुरविण्यात येणार आहे.