मेलबर्न : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकमेंकाचे शेजारी देश आहेत पण क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही प्रतिस्पर्धी तब्बल ३२ वर्षानंतर ‘बाॅक्सिंग डे’ कसोटी खेळण्यासाठी गुरूवारी एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना रंगणार आहे.
Only one more sleep to go! Here's everything you need to know for Day 1 of the Boxing Day Test.
ℹ️ https://t.co/GkmGdU6xA2#AUSvNZ pic.twitter.com/hWl0e685oY
— Melbourne Cricket Ground (@MCG) December 25, 2019
दोन्ही संघातील #AUSvNZ हा दुसरा कसोटी सामना असून आॅस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आॅस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा २९६ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे न्यूझीलंड हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
न्यूझीलंडने याआधी पहिला ‘बाॅक्सिंग डे’ सामना २६ डिसेंबर १९८७ रोजी मेलबर्न येथे खेळला होता. तेव्हा त्याचे सध्याच्या संघातील चार खेळाडू नील वैगनर, राॅस टेलर, बीजे वाटलिंग आणि कोलिन डि ग्रैंडहोम यांचा जन्म झाला होता.
‘बाॅक्सिंग डे’ कसोटी म्हणजे काय ?
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला ‘बाॅक्सिंग डे’ सामना म्हणतात. याचा बाॅक्सिंग या खेळाशी काहीही संबंध नाही.
याच कारणामुळे २६ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या सामन्याला ‘बाॅक्सिंग डे’ कसोटी सामना म्हणतात.
वेगवान गोलंदाज टीम साउथीने सांगितले की, ‘आमच्या संघासाठी हा विशेष क्षण आहे.न्यूझीलंडच्या अनेक दिग्गज खेळाडूंना ‘बाॅक्सिंग डे’ कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही, त्यामुळे हा सामना आमच्यासाठी खास आहे.’
दरम्यान, आज ख्रिसमस असल्याने न्यूझीलंड क्रिकेट आणि संघाने ट्विटर वरून त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Merry Christmas from the MCG
🎄🏏 pic.twitter.com/sr8bdwPyk7— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 24, 2019
‘बाॅक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी जवळपास ७५ हजार प्रेषक हजेरी लावण्याची शक्यता आहे.